शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:43 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी व त्यावर उपाय सांगणारी वृत्तमालिका आजपासून...!कोल्हापूर : अपुरे सेवा रस्ते, या रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंग, वाहतुकीला अडथळे ठरणारे बसथांबे, बेशिस्त वाहतूक यांमुळे उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौक (पंचतारांकित औद्योगिक) पर्यंतचा सात किलोमीटरचा मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील या सात किलोमीटरच्या अंतरामध्ये गेल्या वर्षभरात २४ जणांना जिवाला मुकावे लागले आहे.उत्तर आणि दक्षिण भारतामधील रस्ते वाहतुकीचा दुवा असलेल्या, कोल्हापूरला महामार्गाच्या नकाशावर आणणाºया, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींची जीवनवाहिनी असणाºया राष्ट्रीय महामार्गाचे एक वेगळे महत्त्व आहे. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची दिवस-रात्र ये-जा सुरू असते. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला गती मिळावी, वाहनधारकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशान त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, या उद्देशाच्या उलट स्थिती सध्या या मार्गावर झाली आहे. या मार्गावरील उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौकापर्यंतचे अंतर मृत्यूचा सापळा बनला आहे. सात किलोमीटरच्या या मृत्यूच्या सापळ्याची सुरुवात ही कोल्हापूर शहराकडून शाहू नाक्यापासून येणाºया उजळाईवाडी उड्डाणपुलापासून होते. हा पूल महामार्गाच्या उजव्या बाजूपर्यंत बांधल्याने यावरून येणाºया वाहनांना महामार्गावर प्रवेश करताना जीवघेणी कसरत करावी लागते. या पुलावरून येणारी वाहने महामार्गाच्या कागलच्या दिशेने डाव्या बाजूला जाण्याऐवजी थेट महामार्गावर पुण्याकडून येणाºया वाहनांच्या आडवी जातात. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा चुकलेला थोडासा अंदाज मृत्यूला निमंत्रण देणारा ठरत आहे. या पुलापासून अर्धा किलोमीटर मयूर पेट्रोल पंपाच्या पूर्व बाजूस असणारे वळण हे महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी न बदलता पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहे. या वळणाच्या आधी दिशादर्शक फलक असूनही ते सहजपणे दिसून येत नाहीत. भरीस भर म्हणून येथे बसथांबा आहे. यामुळे येथे रात्रीच्या वेळेस वाहने उलटून अपघात घडत आहेत. गोकुळ शिरगाव-कणेरी फाटा हा सिद्धगिरी मठ-म्युझिअम, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव, नेर्ली-तामगाव-सांगवडे यांना जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. या फाट्यावर उड्डाणपूल आहे.औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी अवजड वाहने, एस. टी., बसेस, कारखानदार व कामगारांच्या वाहनांचे प्रमाण लक्षात घेता, हा पूल वाहतुकीस अपुरा ठरत आहे. हा पूल आणि त्यालगतच्या सेवारस्त्यांवर झालेले विविध स्वरूपांतील अतिक्रमण, या रस्त्यांवरच असणारे बसथांबे, अनेकदा रस्त्याच्या मध्येच थांबणारे वडाप यांमुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सकाळी आठ आणि सायंकाळी पाचनंतर येथे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. या गर्दीतून वाट शोधत पुढे सरकणारे दुचाकीधारक, पादचारी, धोकादायकपणे वळण घेणारी अवजड वाहने, मोठ्या आवाजात वाजणारे हॉर्न असा मोठा गजबजाट येथे रोज असतो. यातून वाहन घेऊन जाणे एक दिव्यच ठरते. या फाट्यावर नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. कणेरीवाडी येथे सेवारस्त्यांची उपलब्ध नसल्याने हे ठिकाण धोकादायक बनलेले आहे. लक्ष्मी टेकडी चौक तर या मार्गावरील अपघातांसाठीचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.वाहतुकीला शिस्त नसल्याने येथे वारंवार अपघात घडतात. अवजड वाहनांना दुचाकी, अन्य वाहने धडकून झालेल्या अपघातांत अनेकांचा येथे मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता, महामार्गावरील वाहतुकीबाबतच्या असुविधा, वाहनधारकांचा बेजबाबदारपणा, बेशिस्त वाहतुकीमुळे हे सात किलोमीटरचे अंतर जीवघेणे ठरत आहे. ‘विमा, मेडिक्लेम पॉलिसी असेल तरच या मार्गावरून प्रवास करा,’ असे म्हणण्यासारखे येथील वास्तव आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस